कोकण रेल्वे ठप्प झाल्याने विविध स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी आता बस उपलब्ध करून देणार
रत्नागिरी जिल्ह्यात काय मुसळधार पडलेल्या पावसाने दिवाणखवटी येथे रेल्वे रुळावर दरड आल्याने रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे कोकण रेल्वे महामंडळाचे कर्मचारी रात्रंदिवस ही दरड बाजूला करण्याचे प्रयत्न करीत आहे मात्र अद्यापही कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झालेली नाही विविध स्थानकावर कालपासून काही रेल्वे गाड्या उभ्या करून ठेवण्यात आले आहेत त्यात असलेल्या प्रवाशांची रखडपट्टी झाली आहे आता कोकण रेल्वे महामंडळातर्फे विविध स्थानकात प्रवाश्यांना करीता बस् ची व्यवस्था केली जात आहे.ज्या ट्रेन विविध स्थानकात उभ्या होत्या त्या तेथेच रद्द करण्याचा निर्णय होत आहे. रेल्वेत अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी बस् ची व्यवस्था केली जात आहे अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहेwww.konkantoday.com