कोकण रेल्वेची बंद पडलेली वाहतूक सुरू होणार दरड बाजूला करण्याचे काम पूर्ण, लवकरच वाहतूक सुरू
* खेड जवळ दिवाण खवटी येथे कोकण रेल्वे ट्रॅक वर काल आलेली दरड व माती दूर करण्यास अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले आहे गेले कित्येक तास कोकण रेल्वेची वाहतूक यामुळे ठप्प झाली होती झाली होती यामुळे अनेक स्टेशनला विविध गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या अडकलेल्या गाडीतील प्रवाशांना काल जेवणाची सुविधा पालकमंत्री उदय सामंत यांनी उपलब्ध करून दिली होती मात्र आज सकाळी या गाड्यातील प्रवाशांना एसटीच्या विविध गाड्यांमधून मुंबई येथे रवाना करण्यात आले होते दरड बाजूला करण्याचे काम अपेक्षेपेक्षा लांबल्याने वाहतूक सुरू करण्यात यश आले नव्हते आज दुपारी हे काम पूर्ण करण्यात आले त्यानंतर कोकण रेल्वे महामंडळाकडून ट्रॅक फिट सर्टिफिकेट देण्यात आले आहे त्यामुळे आता या मार्गावरून वाहतूक सुरू होण्यास कोणतीही अडचण राहिलेले नाही