
काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांची नावे उघड श्रेष्ठींकडे अहवाल पाठवला
विधान परिषदेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. या पराभवामागे काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचे कारण समोर आले आहे.दरम्यान काँग्रेसने या फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.फुटलेल्या आमदारांमध्ये विदर्भातील १, मराठवाड्यातील ३, उत्तर महाराष्ट्रातील २ तर मुंबईतील एक आमदार फुटला आहे. तपशील पाहिल्यास झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, शिरीष चौधरी, मोहन हंबिर्डे आणि जितेश अंतापूरकर यांचा समावेश आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आणि इतर नेत्यांनी बैठक घेऊन अहवाल दिल्लीला पाठवला आहे. जर आता कारवाई केली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.