
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ३ मार्च रोजी
रत्नागिरी, दि. 27 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे मार्च २०२५ चा लोकशाही दिन सोमवार ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ वाजता या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.