
दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने चांगला जोर
दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने चांगला जोर केला आहे जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे खेड तालुक्यात शहरा सह ग्रामीण भागाला गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून रविवारी देखील सकाळ पासून पावसाने चांगलाच जोर आहे भरणे येथील जगबुडी नदी ८ मीटर एवढी इशारा पातळी ओलांडून वाहत आहेदोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने काही अंशी जन जीवन विस्कळीत झाले आहे मात्र सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा कहर कायम आहे चोरद , नारिंगी व जगबुडी या नद्यांच्या पातळीत कमालिची वाढ झाली या मूळे प्रशासन देखील सतर्क झाले असून नद्या काठची गाव वाड्या यांच्या सह खेड शहर वासीयांना सतर्क राहण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत