
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा’ पुरस्कारांची निवड जाहीर
_रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागस्तरावरून दिले जाणारे सन 2023-24 या वर्षीचे ‘आदर्श शाळा’ पुरस्कारांची निवड जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ गटात 10 प्राथमिक शाळां तर वरिष्ठ प्राथमिक गटात 9 पाथमिक शाळांची निवड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.जि.प.शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी आदर्श शाळा पुरस्कारासाठी प्राथमिक शाळांकडून प्रस्ताव मागवण्यात येतात. त्यासाठी जिल्हाभरातून कनिष्ठ गटातून 20 तर वरिष्ठ प्राथमिक गटातून 19 असे एकूण 39 शाळांचे प्रस्ताव जि.प.कडे सादर करण्यात आले होते. या सादर झालेल्या पस्तावांची प्रशासनस्तरावरून छाननी करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थी उपस्थितांचे शेकडा पमाण, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, शाळेतील उपकम, अध्ययन निष्पत्ती आदीं निकषांनुसार पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्या सभेवेळी सीईओ किर्तीकिरण पुजार, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, विस्तार अधिकारी मंजुषा पाध्ये, सायली शिंदे, स.रा.देसाई चे प्राचार्य नेताजी पुंभार, राज्य राष्ट्रीय पुरस्कारपाप्त शिक्षक लक्ष्मण घाडीगावकर, आदी उपस्थित होते. आचारसंहितेपूर्वी या शाळांना पुरस्कार वितरण करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सीईओ किर्तीकिरण पुजार यांनी सांगितले.आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या शाळा पुढीलपमाणेः ‡कनिष्ठ पाथमिक शाळाः-जि.प.पाथमिक शाळा रातांबेवाडी नं.2 (मंडणगड), जि.प.पाथमिक शाळा गावतळे (दापोली), जि.प.पामिक शाळा सुकिवली कुणबी (खेड), जि.प.पाथमिक शाळा पोसरे गुरववाडी (चिपळूण), जि.प.पाथमिक शाळा तळवली नं.2 (गुहागर), जि.प.पाथमिक शाळा हरपुडे नं.2 (संगमेश्वर), जि.प.पाथमिक शाळा पावस नालेवठार व जि.प.पाथमिक शाळा वायंगणी (रत्नागिरी, समान गुण मिळाल्यामुळे विभागून निवड), जि.प.पाथमिक शाळा भडे नं.3 (लांजा), जि.प.पाथमिक शाळा सागवे कात्रादेवी (राजापूर).‡वरिष्ठ पाथमिक शाळाः-जि.प.पूर्ण पाथमिक मराठी शाळा बामणघर (मंडणगड), जि.प.पूर्ण पाथमिक शाळा मळे (दापोली ), जि.प.पूर्ण पाथमिक शाळा वाटव (खेड), जि.प.पूर्ण पाथमिक शाळा बोरगाव नं.1 (चिपळूण), जि.प.पूर्ण पाथमिक शाळा जानवळे नं.1 (गुहागर), जि.प.पूर्ण पाथमिक शाळा पदमा कन्या साखरपा (संगमेश्वर), जि.प.पूर्ण पाथमिक शाळा नाखरे कालकरकोंड (रत्नागिरी), जि.प.पूर्ण पाथमिक केंद्र शाळा रावारी (लांजा), जि.प.पूर्ण पाथमिक केंद्र शाळा करक नं.1 (राजापूर).www.konkantoday com