खेड शहरातील पोत्रिक मोहल्ला येथे पुरात अडकलेल्या अनेक ग्रामस्थांना स्थानिक प्रशासनाने होडीने सुरक्षित स्थळी हलविले
*रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील पोत्रिक मोहल्ला येथे पुरात अडकलेल्या अनेक ग्रामस्थांना स्थानिक प्रशासनाने होडीने सुरक्षित स्थळी हलविले आहे. आताच मिळालेल्या वृत्तानुसार मुसळधार पावसामुळे पुर येण्याचा धोका जास्त असल्याने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने पुणे येथुन एन डी आर एफ टीम ला खेड व चिपळूण येथे पाचारण केले आहे व ही टीम लवकरच दाखल होईल असे सांगण्यात आले आहे खेड येथील जगबुडी नदीला पूर आल्याने शहरात आणि आजूबाजू च्या गावात पाणी शिरल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.प्रांत. तहसिलदार.आदी शासनाच्या प्रतिनिधीं सह सर्वच पक्षाचे नेते मैदानात उतरले असून पूरात अडकलेल्या नागरिकांना मदत करताताना दिसत आहेत.दरम्यान खेड सह चिपळूण संगमेश्वर येथे ही पुराचे पाणी वस्ती आणि बाझारपेठेत घुसल्याने नागरिकांमध्ये काही वेळ भितीचे वातावरण पसरले आहे.. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विविध नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे दरम्यान हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले