एसटी गाड्यांचा दर्जा घसरला, बसच्या छत गळतीने प्रवासी हैराण

मुसळधार पावसात एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांना बसच्या छत गळतीने नाहक त्रास सोसावा लागत आहे. सीट रिकाम्या असूनही उभ्याने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. या संबंधीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. पावसाळ्यापूर्वी बसच्या छताची डागडुजी होणे अपेक्षित असताना याकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.रत्नागिरी विभागात एसटीच्या एकूण ७२० बस आहेत. यातील काही गाड्या या कालबाह्य झाल्या आहेत. तर उपयोगात असलेल्या बस गाड्या दुरूस्तीला आल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button