
मोटरसायकल धडकेत जखमी सायकलस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू; गवाणेवासिय आक्रमकपोलिस स्थानकात धडक
लांजा:- मोटरसायकलची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या गवाणे येथील उमेश पांडूरंग करंबेळे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. यानंतर गवाणेवासिय आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलिस स्थानकात धडक दिली.
महिन्याभरापूर्वी गवाणे येथील उमेश पांडूरंग करंबेळे ( ४७ ) हे लांजा येथे कामासाठी सायकल घेवून आले होते. सायंकाळी ६ वा . सायकलने घरी जात असताना कोर्ले फाटा बसवेश्वर चौक येथे आले असता मोटारसायकलस्वार यांची सायकलला जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथील केईएम रुग्णालयात महिनाभर उपचार सुरु होते. शनिवारी सायंकाळी त्यांचे निधन झाल्यानंतर गवाणे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी रविवारी सकाळी लांजा पोलिस स्थानकासमोर मोठी गर्दी केली होती. मुंबईहुन रुग्णवाहिका लांजा येथे दाखल होताच जोरदार घोषणाबाजी करत मृतदेह येथून हळविण्यास नकार देत आरोपींला अटक करुन त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी देखील शिस्त मंडळाची भेट देवून तातडीने आरोपींला अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात येणार असल्याचे सांगितले
www.konkantoday.com