वीज कंत्राटी कामगार वेतनवाढीपासून वंचित, उपोषणाचा इशारा
वीज उद्योगातील फक्त कायम कामगारांनाच वेतन वाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशाच केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संप महाराष्ट्र राज्यात जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ), अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष उपेंद्र थुळ यांनी दिली.www.konkantoday.com