वरंधा घाटात वाहतुकीला बंदी धुडकावत धोकादायक वाहतूक सुरूच
रायगड जिल्ह्यातील भोर-महाड-वरंधा घाटातील खचलेला रस्यासह कोसळणार्या दरडीचा संभाव्य धोका लक्षात घेवून ३१ ऑगस्टपर्यंत घाटातील रस्ता वाहतुकीस बंद करण्याच्या प्रस्तावाला अखेर रायगड जिल्हाधिकार्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत घाटातून सर्वच वाहनांना वाहतुकीस अटकाव करण्यात आला आहे. पोलादपूर, कराड, कोल्हापूर मार्गाचा अवलंब करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र, वाहतुकीस मज्जाव करण्यात आलेला असतानाही घाटातून धोकादायक वाहतूक सुरूच आहे.www.konkantoday.com