रस्ते कंत्राटदाराला दंड ठोठावल्याची खोटी माहिती दिली, मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात अनिल परब यांनी आणला हक्कभंगाचा प्रस्ताव
मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात शिवसेना नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. मुंबईतील रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण प्रकरणामध्ये उदय सामंत यांनी सभागृहाला खोटी माहिती दिल्याचं सांगत अनिल परब यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडला. कॉंक्रीटीकरणाच्या कामाला उशीर झालाय म्हणून कंपनीला दंड केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली होती. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच झालं नसल्याचा दावा अनिल परब यांनी केला.सभागृहाची फसवणूक केली म्हणून सभागृहात विरोधी पक्षातील नेत्यांनी उभे राहून तालिका सभापती मनीषा कायंदे यांच्याकडे उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली. उदय सामंत यांनी मुंबईतील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण प्रकरणात कामाला उशीर केला म्हणून रोडवेज सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर ६४ कोटी रुपयांचा दंड केल्याची माहिती दिली होती. मात्र प्रत्यक्षात असं काही झालंच नाही. त्यामुळे उदय सामंत यांनी सभागृहाला खोटी माहिती दिल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. www.konkantoday.com