रत्नागिरीत रेनवॉटर हार्वेस्टींग, सोलर एनर्जीकडून जनजागृती

रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाळा सुरू होताच पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवते, त्यासाठी सामाजिक उपक्रमांतर्गत सक्रीय असलेल्या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे रेन वॉटर हार्वेस्टींग आणि सोलर एनर्जी यासाठी जनजागृतीचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यासाठी लवकरच जनजागृतीसाठी शहर आणि ग्रामपंचायतस्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष हिराकांत साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे पदाधिकार्‍यांचे आगामी मिशन, व्हिजन आणि आगामी वर्षातील प्रकल्प यांची माहिती शुक्रवारी विषद केली. यावेळी या क्लबचे अध्यक्ष साळवी यांच्यासह पदाधिकारी रोटे बिपीनचंद्र गांधी, डॉ. संदीप करे, समीर इंदुलकर, राजेंद्र कदम, डॉ. वैभव कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button