रत्नागिरीतील मुलीला वारंवार मेसेज पाठवून, व्हिडीओ करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या पुण्यातील तरुणाला मुंबई येथून अटक
रत्नागिरी:- मुलीला वारंवार मेसेज पाठवून, व्हिडीओ करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या पुण्यातील तरुणाला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. दशरथ सिध्दराम गायकवाड ऊर्फ वनराज आश्विन देशमुख (32 वर्षे रा. संतोष नगर, पाण्याचे टाकीजवळ, शनिमंदिर समोर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यानुसार संशयित आरोपीवर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे इंस्टाग्राम आयडीवर त्याचे इंस्टाग्राम आयडी व वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चॅटींग करुन तसेच फिर्यादी यांना वारंवांर व्हिडीओ कॉल करुन फिर्यादी यांचे अश्लील अवस्थेतील फोटो काढुन ते इंस्टाग्राम या सोशल मिडीया अकाऊंटवर प्रसारीत करुन, तसेच व्हॉटस्अॅपद्वारे अनेकांना पाठवुन, प्रसारीत करुन, फिर्यादी यांची बदनामी केली. तसेच फिर्यादी यांना त्यांचे वडील व भावाला शिविगाळ केली. याबाबतची फिर्याद रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झाली.गुन्हयातील आरोपीत दशरथ सिध्दराम गायकवाड ऊर्फ वनराज आश्विन देशमुख हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा पुणे येथील परिसरात तपास करत असताना तो मिळुन येत नव्हता. तसेच त्याचा मोबाईलही बंद होता. त्याच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही माहिती मिळुन येत नव्हती.गुन्हयातील आरोपीत दशरथ सिध्दराम गायकवाड ऊर्फ वनराज आश्विन देशमुख हा देवनार चेंबुर मुंबई येथे असल्याची गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाल्याने नमुद आरोपीत याचा देवनार चेबुर मुंबई परिसरात जावुन शोध घेण्यात आला. तेथे असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला मुंबई येथुन ताब्यात घेण्यात आले. मुंबईवरून त्याला ९ रत्नागिरी येथे गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली. आरोपीत याचे ताब्यातुन त्याने गुन्हयात वापर केलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला. आरोपीत याने फिर्यादी यांचे प्रमाणे इतर मुलींशी देखील सोशल मिडीया इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप अकाऊंटवर चॅटींग तसेच व्हीडीओ कॉल करुन अनेक मुलींचे अश्लिल फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचे तपासात निष्पन्न झाले www.konkantoday.com