
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील भोगावचा मार्ग डेंजर झोनमध्ये
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी हद्दीतील भोगाव मार्ग डेंजरझोनमध्ये आहे. मुसळधार पावसामुळे भोगावचा रस्ता हळुहळू खचत आहे. यामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. जीव मुठीत धरूनच वाहनचाकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. वर्षानुवर्षे भोगावचा मार्ग पावसाळ्यात खचत असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याने अपघातांसह दुर्घटनेचा धोका कायम आहे.पोलादपूरपासून ९ कि.मी. अंतरावर असलेला रस्ता दरवर्षी खचतो. यंदाही हीच परिस्थिती आहे. रत्नागिरीच्या दक्षिण व मुंबईच्या उत्तर बाजूने २ फूट रस्ता पूर्णपणे खचला आहे. धो-धो कोसळणार्या पावसामुळे रस्ता खचण्याची प्रक्रिया सुरू होवून अंदाजे १०० मीटर अंतरात साडेतीन फूट खोलवर रस्ता खचत असल्याची बाबदेखील समोर आली आहे. मात्र तरीदेखील मार्ग सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग केवळ मलमपट्टीच्या तकलादू उपाययोजना करत आहे. www.konkantoday.com