
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात गॅस गळती,पिवळ्या रंगाच्या धुराचे साम्राज्य
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात गॅस गळतीची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गॅस गळती झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तेथील विविध कंपन्यांतून बाहेर येत घटनास्थळी धाव घेतली होती. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर टी-150 मधील आरती घटनास्थळी धाव घेतली.गळती होताच कामगारांनी कारखान्यांमधून पळ काढला असून या गॅस गळतीमुळे परिसरात पिवळ्या कलरच्या धुराचा साम्राज्य पसरल होतं. घटना घडताच घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली, त्यानंतर कंपनीतील संबंधितांनीही गॅस गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केल्याने, कारखान्यातील वायुगळती थांबवली गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली