
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेत उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला भगदाड
रत्नागिरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनार्यावरील संरक्षक भिंतीला सध्या मोठे भगदाड पडले आहे. तसेच या संरक्षक भिंतीला समुद्राच्या उसळणार्या मोठ्या लाटांचा तडाखा बसत असल्याने संरक्षक भिंतीचा बराचसा भाग कोसळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.श्री क्षेत्र गणपतीपुळेतील समुद्रकिनार्यावर असलेल्या विश्रामगृह इमारतीसमोर असलेल्या संरक्षक भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. गेल्या ५-६ वर्षापासून येथील संरक्षक भिंतीचा भाग कोसळला आहे. मात्र त्यानंतर अद्यापही याकडे संबंधित मेरिटाईम बोर्ड विभागाने लक्ष दिले नसल्यामुळे संरक्षक भिंतीचा कोसळलेला भाग जैसे थे येथे राहिला होता. येथील समुद्रकिनार्यावर गेल्या काही वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून पर्यटकांना पायर्यांवर बसून अथांग पसरलेल्या समुद्राचा मनसोक्त आनंद घेता यावा, यासाठी पायर्या पायर्यांची संरक्षक भिंत पर्यटन विकास आराखड्यांतर्गत बांधण्यात आली. यावर मेरिटाईमने निधी खर्ची घातला होता .www.konkantoday.com