डेरवणमध्ये रोबोटीक, एआय लॅबचे उदघाटन

डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आफ सायन्स या प्रशालेमध्ये नुकतेच रोबोटीक व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा अत्याधुनिक अभ्यासक्रमाने युक्त असणार्‍या प्राथमिक व माध्यमिक दोन्ही विभागाचे उदघाटन राज्यसभेचे माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले.स्काय रोबोटिकचे डायरेक्टर अभिजित सहस्त्रबुद्धे आणि श्रीयुत कृष्णमूर्ती यांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम इयत्ता पहिली ते दहावीकरिता या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. उदघाटनानंतर शाळेमधील कार्यान्वित अटल टिकरीन लॅब, स्पेस लॅब आणि कलादालनाला डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी भेट दिली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button