ठेकेदाराने छप्पर दुरूस्ती न केल्याने गोळवशी नं. १ शाळा भरतेय ग्रामस्थांच्या घरात
तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही ठेकेदाराकडून शाळेचे छप्पर दुरूस्ती केली जात नसल्याने गोळवशी शाळा नं. १ ही ग्रामस्थांच्या घरात भरत आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळेच ही वेळ आली असून यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेल्या गोळवशी गावातील जि.प. शाळा क्र. २ नादुरूस्त झाली आहे. संपूर्ण इमारत नव्याने बांधणे गरजेचे आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्याने किमान या शाळेचे छप्पर तरी बांधून घ्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश खानविलकर यांनी केली होती. त्यानंतर या शाळेच्या छप्पर दुरूस्तीसाठी सुमारे ६० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तर छप्पर दुरूस्ती करण्ययाच्या दृष्टीने ग्रामस्थांनी मार्च महिन्यात श्रमदान करून छप्परावरील कौले, वासे व अन्य साहित्य बाजूला काढून ठेवले होते. तर काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असे आश्वासनही ठेकेदाराने ग्रामस्थांना दिले होते. मात्र या गोष्टीला ३ महिन्यांचा कालावधी झाला आणि शाळा सुरू होवून १५ दिवस उलटले तरी ठेकेदाराकडून शाळेचे छप्पर दुरूस्तीचे काम हाती घेतलेले नाही. www.konkantoday.com