
रत्नागिरी येथील रंगकर्मी सुनील बेंडखळे यांना मनापचा उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार
रत्नागिरी येथील रंगकर्मी सुनील बेंडखळे यांना यावर्षीचा मराठी नाट्य परिषदेकडून उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोकणचा साज संगमेश्वरी बाज या लोकनाट्याद्वारे लोककलांचा सुरू असलेल्या प्रसार व प्रचाराचे काम लक्षात घेवून त्यांना या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १४ जूनला कै. शाहीर साबळे, कै. सुधीर भट, कै. स्मिता तळवलकर, कै. आनंद अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी सुनील बेंडखळे यांची निवड झाली आहे. १४ जून रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सुनील बेंडखळे यांनी कोकणचा साज संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचे मुंबईसह संपूर्ण कोकणात आतापर्यंत जवळपास ४५० प्रयोग सादर केले आहेत. रत्नागिरीतील स्टार थिएटरच्या माध्यमाातून आपल्या नाट्यकला जोपासण्यासाठी सुरूवात केली. अनेक नाटक, एकांकिका, शॉर्टफिल्म, वेबसिरीज, सिनेमांतून सुनील बेंडखळे यांनी काम केले आहे. नुकतीच त्यांची लंपन ही वेबसिरीज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.www.konkantoday.com