गांजाची टीप दिल्याच्या आरोपावरून मारहाण, एकाची निर्दोष मुक्तता

मी गांजा विकत असल्याची टीप पोलिसांना देतोस काय? तुला ठार मारतो असे म्हणत मारहाण केली. गाडीच्या चावीने गळ्याखाली, छातीवर जबरदस्त मारल्याने दुखापत झाली अशा आशयाची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास पूर्ण केला. न्यायालयात तरूणाविरूद्ध आरोपपत्र दाखल केले परंतु सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलली.सहल मुनीर कर्लेकर (हयातनगर, रत्नागिरी) हा जयगड येथील तटरक्षक दलाचे देखभाल दुरूस्तीचे काम करतो. त्याला कंपनीने स्वीफ्ट डिझायर गाडी वापरण्यास दिली. ४ जानेवारी २०२० रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास सहल हा उद्यमनगर येथे घरी येत असताना शफाकत हसन आदम राजापूरकर (३९, साखरतर, रत्नागिरी) याने तेथे येवून पैशाची मागणी केली तसेच मी गांजा विकतो अशी टीप पोलिसांना देतोस काय, तुला ठार मारतो, अशी धमकी सहल याला दिली. यावेळी राजापूरकर याने गाडीच्या चावीने सहल याच्या गळ्याखाली जोरदार मारले, त्यात दुखापती झाल्या, अशी तक्रार  सहल याने पोलिसांकडे नोंदवली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button