
खेड बसस्थानकातील खड्ड्यांमुळे एसटी चालकांची होतेय दमछाक
खेड बसस्थानकात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे चालकांची दमछाक होत आहे. भरणे व दापोली दिशेकडील प्रवेशद्वाराजवळ खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे एसटी बस मार्गस्थ करताना बसचालकांची कसरत सुरू आहे. पावसामुळे खड्ड्यांचा विस्तार वाढत असतानाही एसटी प्रशासन खड्डे बुजविण्यासाठी कुठलीच ठोस पावले उचलत नसल्याने प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून शहरापर्यंत रस्त्यांवर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडतले आहेत. www.konkantoday.com