कोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अजूनही बिघडलेलेच
पेडणे-गोवा येथील बोगद्यात रेल्वेमार्गावर साचलेल्या चिखलमिश्रित पाण्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक तब्बल १७ तासानंतर पूर्ववत झाली असली तरी वेळापत्रक अजूनही बिघडलेलेच आहे. शुक्रवारी एलटीटी-मडगाव ×एक्सप्रेससह पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेसला तब्बल ४ तासांचा लेटमार्क मिळाला. अन्य ७ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम राहिला. कोकण रेल्वेचे विस्कळीत वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. www.konkantoday.com