
उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांचा निवडणुकीत विजय
विधानपरिषद निवडणुकीच्या अकराही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये ठाकरे गटानेही मोठं यश मिळवलं आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे.या अकराही जागांमध्ये मिलिंद नार्वेकर यांचा निकाल शेवटी जाहीर झाला. या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मिलिंद नार्वेकर यांना २२ तर जयंत पाटील यांना १२ मते मिळाली होती, मात्र मिलिंद नार्वेकर यांना निर्णायक २३ मते मिळाली आणि त्यांचा विजय झाला. नार्वेकर यांच्या विजयाची बातमी समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत नार्वेकरांचा विजय साजरा केला.