आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीत १७ रोजी अभंगवाणी
आषाढी एकादशीनिमित्त अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे हे दहावे वर्ष असून १७ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जोशी पाळंद येथील भगवान परशुराम सभागृहात ही मैफल होईल.यावेळी प्रसाद शेवडे (देवगड) आणि भाग्यश्री आठल्ये-जोशी (देवगड) हे गायक कलाकार अभंग गायन करणार असून वामन जोग निवेदनातून विठ्ठल भक्तीचा महिमा उलगडणार आहेत. मैफलीसाठी ऑर्गनसाथ संतोष आठवले, हार्मोनियमसाथ निरंजन गोडबोले, तबलासाथ निखिल रानडे, पखवाजसाथ गणेश रानडे आणि तबलावाद्यांची साथ सुहास सोहनी हे करणार आहेत. एस. कुमार साऊंडचे उदयराज सावंत ध्वनीसंयोजन करणार आहेत. संगीतप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. www.konkantoday.com