साखरपा येथेकोल्हापूर- गणपतीपुळे मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला डंपरची धडक, चालक जखमी
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून पावसाने जोर केला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाले आहेतकोल्हापूर- गणपतीपुळे मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला डंपरची धडक बसल्याने अपघात झाला आहे. अपघातात चालक जखमी झाला. आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास साखरपा येथे हा अपघात झाला.रत्नागिरी आगाराची बस क्र. (एम एच १४ बी टी २२२९) कोल्हापूर गणपतीपुळे मार्गावर धावत असताना बसला देवळे घाट येथे (डंपर क्र एम एच १० सी आर २५७३) ने धडक दिलेने बस वळणावर घसरली. या अपघातात बस चालक जखमी झाला आहे. सुदैवाने बसमधील प्रवाशी जखमी नाहीत.