विद्यार्थ्यांनी कोळंबी संवर्धन क्षेत्रात उतरून उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करावी
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन साजरा करण्यात आला. मत्स्य महाविद्यालयाने चार दिवसांपूर्वीच कोळंबी बीज संचयन केलेल्या महाविद्यालयाच्या आवारातील संवर्धन तलावावर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधाकर इंदुलकर यांनी मत्स्य संवर्धन दिनाचे महत्व विषद केले. आणि विद्यार्थ्यांनी कोळंबी संवर्धन क्षेत्रात उतरून उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या कोळंबी संवर्धन क्षेत्रात रत्नागिरी परिसरात कार्यरत असलेले कोळंबी संवर्धक सर्वश्री भुपेंद्र परब, आकाश बंडागळे, अनिकेत निवदेकर, निलेश सावंत, आकाश नाचरे, संकेत हळदणकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. www.konkantoday.com