रिफायनरी विरोधकांच्या जीविताला धोका -माजी खासदार विनायक राऊत यांचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन

रिफायनरी विरोधकांना परत जावू देणार नाही, असा इशारा खा. नारायण राणे यांनी दिला असल्याने आपल्या व रिफायनरी विरोधकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी, असे निवेदन माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांना दिले आहे.राजापूर दौर्‍यावर असलेल्या खा. नारायण राणे यांनी रिफायनरी विरोधकांना गंभीर धमकी दिली आहे. रिफायनरी प्रकल्पाला नाणारमध्ये विरोध होता. त्यानंतर बारसूमध्ये विरोध सुरु झाला. आपण स्वतः उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे यापुढे विरोधकांना परत जावू देणार नाही अशी गर्भित धमकी दिली आहे. त्यामुळे याची पोलीस अधिक्षकांनी दखल घेवून कारवाई करावी, अशी विनंती माजी खा. विनायक राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button