रायगड किल्ल्याच्या महादरवाजा नजिक दरड कोसळली! पायरी मार्ग बंद असल्याने दुर्घटना टळली!!

हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील महादरवाजाच्या अलीकडील भागामध्ये आज दुपारनंतर दरड कोसळली आहे. जिल्हा प्रशासनाने आधीच पायरी मार्गावरून किल्ल्यावर जाण्यास बंदी केल्याने संभाव्य दुर्घटना टळली.स्थानिका ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार महादरवाजाच्या अलीकडील सपाटीकरण असलेल्या भागामध्ये ही दरड कोसळली. ही दरड कोसळून रस्ता बंद झालेला आहे, ही दरड हटवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. बुर्ले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button