
सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे शिवसेना नेते, पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज शिवाई प्रतिष्ठान व यशस्वी ॲकडमी फॉर स्कील यांच्या संयुक्त विद्यमाने रामपूर येथील मिलिंद विद्यालयाच्या पटांगणात सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना नेते, पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री ॲड.अनिल परब, नोकरी महोत्सवांचे आयोजन करणारे आमदार भास्कर जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, आमदार शेखर निकम, योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर, शिक्षण सभापती सुनील मोरे,, जि.प.सदस्य विक्रांत जाधव उपस्थित होते.
www.konkantoday.com