रत्नागिरीच्या कामगार कल्याण केंद्रात नेत्र तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील कामगार कल्याण केंद्रात लायन्स क्लबच्या सहकार्याने दिनांक 11 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी लायन्स क्लबचे डॉक्टर किशोर सूर्यवंशी आणि संयोजक श्री विजय मोरये यांनी सुमारे 100 जणांची नेत्र तपासणी केली. कामगार कल्याण केंद्राच्या संचालिका सौ संस्कृती शिंदे यांनी शिबिराचे संयोजन केले. समाजभूषण श्री. सुरेंद्र घुडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी नेत्र तपासणी शिबिराच्या उपक्रमाची प्रशंसा केली. शिबिराच्या आयोजनात श्री. ज्ञानेश्वर पाटील आणि सौ. पूजा नागवेकर यांनी सहकार्य केले.