मानक कार्य प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे यंदा चिपळुणातील पूर पातळी नियंत्रित
गेल्या रविवारी धुवाधार कोसळत असलेल्या पावसात जिल्ह्यातील बहुतांशी नद्या इशारा, धोकादायक पातळी ओलांडून वाहत असताना नेहमी चर्चेत असलेली चिपळूणची वाशिष्ठी नदी मात्र पूर्णपणे शांत होती. तब्बल १८५ मि.मि. पाऊस कोसळूनही साधी इशारा पातळीही वशिष्ठी नदीने गाठलेली नाही. नदीतील गाळ उपशाने वाढलेल्या वहनक्षमतेचा मोठा परिणाम दिसत असतानाच शासन नियुक्त चिपळूण पूर आणि कोळकेवाडी अवजड अभ्यास गटाने सूचविलेल्या मानक कार्य प्रणालीची (स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसीजर म्हणजेच एसओपी) प्रभावी अंमलबजावणी पूरनियंत्रणात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. www.konkantoday.com