पुरेसा कोटा असूनही विजयासाठी संघर्ष; अखेर काँग्रेससाठी गोड बातमी! विधान परिषदेचा निकाल समोर

राज्यातील सर्व 274 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीतून विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या आघाडीवर होत्या. पण नंतर अचानक भाजप उमेदवार आघाडीवर असल्याची बातमी आली. यानंतर अखेर प्रज्ञा सातव यांनी 23 मतांचा कोटा पूर्ण केला आहे. प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे.या निवडणुकीत काँग्रेसने केवळ 1 उमेदवार दिला होता. विजयासाठी 23 मतांची आवश्यकता होती. पण काँग्रेसकडे 38 हक्काची मते होती. त्यामुळे प्रज्ञा सातव या सहज जिंकून आल्या आहेत. प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे काँग्रेसमधील मोठे नेते होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ते निकटवर्तीय होते. तसेच राजीव सातीव यांचे गांधी कुटुंबासोबत घनिष्ट संबंध होते. पण तीन वर्षांपूर्वी राजीव सातव यांचं निधन झालं होतं. राजीव सातव यांच्या निधन नंतर प्रज्ञा सातव यांची नोव्हेंबर 2021 मध्ये विधान परिषदेत बिनविरोध निवड करण्यात आली होती. यानंतर त्यांना काँग्रेसकडून यावर्षीदेखील विधान परिषदेची संधी देण्यात आली.या निवडणुकीचा पहिला निकाल हा भाजपच्या बाजूने लागला. भाजपचे योगेश टिळेकर यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचादेखील विजय झाला आहे. योगेश टिळेकर यांच्यानंतर पंकजा मुंडे या दुसऱ्या विजयी ठरल्या. त्यानंतर भाजपचेच उमेदवार परिणय फुके हे विजयी झाल्याची तिसरी बातमी आली. या निवडणुकीत भाजपचे चारही उमेदवार जिंकून आले आहेत. तर भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत यांचा निकाल रखडला होता. अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचाही विजय जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात चुरस रंगल्याचं बघायला मिळालं. पण अखेर सदाभाऊ खोत यांचा विजय समोर आला. त्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवाराता पराभव झाल्याचं स्पष्ट झालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button