
नोकरी सोडा बेरोजगार युवकाची स्वतःची दुचाकी पण भामट्याने चोरून नेली
कणकवलीत नोकरीला लावतो, असे सांगून संगमेश्वर येथील युवकाला जाधव नावाच्या व्यक्तीने कुडाळ येथे आणले, तर परत जाताना त्या युवकाला फोंडाघाटात एकटे सोडून तसेच दुचाकी घेऊन संशयित जाधव हा फरार झाला. त्याच्याविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला.पोलिसांनी दिलेली माहिती, फिर्यादी अनिकेत संदीप नागवेकर (वय २२, रा. आंबेड, भंडारवाडी, ता. संगमेश्वर) हा तेथीलच एका कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. नागवेकर राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या चाळीमध्ये आठ दिवसांपूर्वी जाधव ही सुमारे ६० बर्षे वयाची व्यक्ती भाड्याने रहायला आली. त्याची आणि अनिकेत नागवेकर याची ओळख झाली जाधव याने तुला कणकवलीत नोकरीला लावतो असे आमिष दाखवले. त्यानुसार २९ जून रोजी अनिकेत नागवेकर याने शेजारच्याची दुचाकी घेतली. या दुचाकीवरून जाधव आणि नागवेकर है कणकवलीत आले. २ जुलै रोजी कुडाळ येथून जाधव आणि अनिकेत नागवेकर हे दुचाकीवरून फोंडाघाट मार्गे संगमेश्वरला जाण्यासाठी निघाले. सकाळी आठच्या सुमारास फोंडाघाटातील निर्जन ठिकाणी आल्यानंतर जाधव याने लघु शंकेच्या बहाण्याने दुचाकी थांबवली. यात अनिकेत नागवेकर खाली उतरल्यानंतर जाधव हा दुचाकी घेऊन कोल्हापूरच्या दिशेने पसार झाला.