दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांना समन्स

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांना समन्स बजावलं आहे. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी चौकशीला या, असं समन्स मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी नितेश राणेंना पाठवलं आहे.दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आपल्याला काही माहिती असल्यास ही माहिती मांडण्याकरता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी पथकातील अधिकाऱ्यांच्या समक्ष उपस्थित राहावं, असं या नोटीसमध्ये लिहिण्यात आलं आहे.दिशा सालियानची हत्या झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी याआधी अनेकवेळा केला आहे. दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत यांचा मृत्यू घातपात असल्याचे आरोप करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंबाबत संशय व्यक्त केला आहे.दिशा सालियान मृत्यू प्रकरणी समन्स आल्यानंतर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियानचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप बाहेर का आला नाही? नितेश राणे जर खोटं बोलत असेल तर आदित्य ठाकरेंनी सांगावं. आम्ही पुण्याच्या अग्रवालला सोडलं नाही, मिहिर शाहला सोडलं नाही आणि आदित्य ठाकरेंनाही सोडणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिशा सालियान मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली होती, यानंतर आता या एसआयटीसमोर नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button