गणेशोत्सवासाठी ठाणे विभागातून यंदाही सुमारे 2 हजार बसेस कोकणच्या वाटेवर धावणार
यंदा गणपती बाप्पांचे आगमन 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी एस. टी. महामंडळाने जादा वाहतूकीचे नियोजन सुरू केले आहे. ठाणे विभागातून यंदाही सुमारे 2 हजार बसेस कोकणच्या वाटेवर धावणार आहेत.जाण्यासाठी 405 बसेस आरक्षणासाठी ठेवण्यात आल्या आहेत, त्यातील सुमारे 137 बसेसचे आरक्षण फुल्ल झाले असून 270 बसेस बुकींग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. 3 सप्टेंबर पासून या बसेस कोकणासाठी धावणार आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी ठाणे विभागातील सर्व आगारातून तसेच बोरिवली आणि भांडूप येथून मागणीनुसार एस. टी. महामंडळ बसेस सोडते. त्यासाठी महिना -दीड महिना आधीच आरक्षण खुले केले जाते. यंदाही ठाणे विभागातून जुलैच्या महिन्यात 405 बसेस आरक्षणासाठी ठेवल्या होत्या. त्यातील 137 बसेस फुल्ल झाल्या असून 137 बसेससही फुल्ल होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती एस. टी महामंडळाच्या ठाणे विभागाचे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली.