कॉंग्रेस खा. राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करा, दापोलीतील हिंदू संघटनांची मागणी
कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान केले असून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करा, अशी मागणी दापोलीतील हिंदू संघटनांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेतच पण हिंदू धर्माला व संस्कृतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याची त्यांची मानसिकता यातून त्यांनी प्रकट केली आहे. www.konkantoday.com