
इंडियन रेडक्रॉस सोसायटी रत्नागिरी यांच्या वतीने रक्त संकलन करणेसाठी सुसज्ज आणि अद्ययावत मोबाईल ब्लड कलेक्शन व्हेइकल उपलब्ध
इंडियन रेडक्रॉस सोसायटी रत्नागिरी रक्तपेढी गेली ४० हुन अधिक वर्ष गरजू रुग्णांना रक्त व रक्तघटकांचा(प्लेटलेट, प्लाजमा, पिसिव्ही) पुरवठा केला जातो. शासकिय नियमानुसार आकारण्यात येणाऱ्या शुल्का पेक्षा माफक दरात रक्त पुरवठा केला जातो. तसेच रक्त दात्याना सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध होते. रक्ताचा तुटवडा भासू नये या करिता हे वाहन सज्ज करण्यात आले आहे. या वाहनाची वैशिष्ठ म्हणजे डोनर रजिस्ट्रेशन, रक्तदान पूर्व आरोग्य तपासणी, रक्तदान साठी ऑटोमॅटिक रिमोट कंट्रोल बेड, वातानुकूलित यंत्रणा, रक्त संकलन साठी रिफ्रिजरेटर तसेच शितपेटी, पोस्ट डोनेशन केअर युनिट, इत्यादी सुविधा आहेत. बऱ्याच वेळा रक्तदान शिबिर आयोजक यांना बेड, हॉल यांची व्यवस्था करावी लागते. परंतू आता अशी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रक्तदान शिबिर घेणे सुलभ होणार आहे. आवाहन करण्यात येत आहे की रक्तदान शिबिर साठी रेड क्रॉस रक्तपेढी रत्नागिरी येथे संपर्क करावा