
वाशिष्ठी पुलावरील खड्डे भरले,शौकत मुकादम,आ. निकम यांच्या प्रयत्नाला यश
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूर शेख नाका येथील वाशिष्ठी पुलावरील खड्डे तातडीने भरावेत, यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आमदार शेखर निकम यांनी यात गांभीर्याने लक्ष देऊन अधिकाऱ्यांना खड्डे भरण्याची सूचना दिली. सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास महामार्ग बंद ठेवून हे खड्डे भरण्यात आले आहेत. त्यामुळे वाशिष्ठी पुलावरील वाहनचालकांचा प्रवास सुखकर झाला आहे.
www.konkantoday.com