वाटुळ राजापूर येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला खास बाब म्हणुन मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी दिली आज मंजुरी..आता राजन साळवी राजकारणातून निवृत्ती घेणार का?
रत्नागिरी, दि. ११ जुलै : राजापूर येथे महामार्गानजिक होणाऱ्या हॉस्पीटलला खास बाब म्हणुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज मंजुरी दिली असून आजचा दिवस राजापूर वासियांना ऐतिहासिक आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी वाटुळ येथील संभाव्य सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलच्या जागेची ८ दिवसापूर्वी पाहणी केली. जागेची पाहणी करताना सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलच्या प्रस्तावाबाबत किरण सामंत यांच्या कडून पाठपुरावा सुरु होता.सुपरस्पशालिटी हॉस्पीटलला 25 पैकी 5 एकर जागा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी द्यायचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सिंधुरत्नचे निमंत्रित सदस्य किरण सामंत यांनी पाठपुरावा केला होता.सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त रंगा नायक यांच्याकडे सध्या हा प्रस्ताव प्रलंबित होता.त्याचा पाठपुरावा करून पालकमंत्री उदय सामंत यांनी अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आज स्वाक्षऱ्या घेऊन राजापूर वासियांना मोठे गिफ्ट दिले आहे. आज वाटुळ राजापूर येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला खास बाब म्हणुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मंजुरी दिली आहे. *या हॉस्पिटल संदर्भात राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना आव्हान दिले होते आपण या हॉस्पिटल साठी पाठपुरावा केला असून आपण सर्व कागदपत्रे दाखवण्यास तयार आहोत मात्र सामंत यांनी कागदपत्रे दाखवावीत असे आव्हान राजन साळवी यांनी दिले होते ते न दाखवू शकल्यास त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा कागदपत्र दाखवल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ असे साळवी यांनी सांगितले होते त्या आव्हानाला सामंत बंधूंनी कृतीतून उत्तर दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री यांनी आव्हान पूर्ण केल्यानंतर आमदार राजन साळवी राजकीय निवृत्ती घेणार होते असे त्यांनी जाहीर केले होते. त्यांनी आव्हान तर पूर्ण केले मात्र राजन साळवी आता राजकीय निवृत्ती येणार का असा सवाल सामंत समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे राजापूरकराचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी १५ ऑगस्टची मुदत दिली होती मात्र हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मदतीने ८ दिवसात मोकळा केला यांचा मला अभिमान असून मी ठीकेला कामातून उत्तर देतो हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखलवे आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले.