रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या १५५३ रूग्णांवर घरी उपचार
जिल्ह्यामध्ये डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम सुरू असून १ ते ८ जुलैपर्यंत झालेल्या सर्वेक्षणात ७५९२ घरांमध्ये २६८६८ पाणी साठे असलेली भांडी तपासली, त्यापैकी ४७६ घरांमध्यये पाणी असलेल्या १०५९ भांड्यांमध्ये डास अळी आढळून आली. तसेच १५५३ ताप रूग्णांची रक्तनमुना तपासणी करून त्यांच्यावर घरी उपचार करण्यात आले. जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूच्या १५५ रूग्णांची जिल्हा आरोग्य विभागाकडे अधिकृत नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.ही मोहीम १ ते ३१ जुलै दरम्यान राबविली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली. जुलै महिना हा डेंग्यू प्रतिरोधक महिना म्हणून राबविला जात असल्याने आरोग्य विभागाकडून सर्व घरांना भेटी देवून डास अळी असलेली भांडी तपासणे, त्यामध्ये टेमिफोसचे द्रावण टाकून ती भांडी रिकामी करणे, तसेच ताप रूग्णाचा रक्तनमुना घेवून घरी किंवा त्यात गप्पी मासे सोडणे, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, डेंग्यू आजाराबद्दल आरोग्य शिक्षण देणे ही सर्व कामे या मोहिमेमध्ये केली जात आहे. आतापर्यंत ४०९६ घरांमध्ये धूरफवारणी केल्याची माहिती डॉ. यादव यांनी दिली आहे. जतनेने स्वतःहून सहभागी होवून या सर्व उपाययोजना राबवल्या तर डेंग्यू आजारावर आपण नियंत्रण आणू शकतो असे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये म्हणाले. www.konkantoday.com