रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मागासवर्गीय गट प्राथमिक शिक्षकांची ५११ पदे रिक्त
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात नव्याने शिक्षक भरती झाल्यानंतरही जवळपास ३० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे अनुसूचित जाती, जमातीसह राखीव गटातील पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त राहिली आहेत. ५११ राखीव पदांची भरती शासनाने केेलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे आरक्षणानुसार ७ हजार ७९ एवढी शिल्लक पदे मंजूर आहेत. यापैकी ५९५५ एवढी पदे कार्यरत आहेत. तर ११२४ पदे रिक्त आहेत. यापैकी अनुसूचित जातींची ९४, अनुसूचित जमातीची २०१, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींची ७२ पदे रिक्त आहेत. इतर मागासवर्गीयांची १९३ पदे रिक्त आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आलेली १६ पदे रिक्त आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी आरक्षित ठेवलेली ६५ पदे रिक्त आहेत. तर खुल्या प्रवर्गासाठीची ६१३ पदे रिक्त आहेत. अशी एकूण ११२४ पदे रिक्त आहेत.www.konkantoday.com