
रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर ३१ ला चिपळुणात
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी चिपळूण दौर्यावर येत आहेत. शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे सकाळी ११ वा. त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे या संवाद मेळाव्यातून रिपब्लिकन सेनेचे आगामी धोरण, संघटनात्मक दिशा आणि सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला राज्य महासचिव विनोद काळे, कोकण प्रदेश अध्यक्ष विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपाध्यक्ष अशोक कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com




