
बँकांचे मत्स्य व्यवसाय, पशुपालन, दुग्धव्यावसायासाठी कर्ज देण्यास आखडते हात
बँकांचे मत्स्य व्यवसाय, पशुपालन, दुग्धव्यावसायासाठी कर्ज देण्यास आखडते हातपीक कर्ज उद्दिष्टांची पूर्ती करून अधिक कर्ज वाटप करणार्या बँका मत्स्य व्यवसाय, पशुपालन, दुग्धव्यावसायासाठी मात्र हात आखडता घेत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात बँकांनी पीक कर्जासाठी खरीप हंगामात उद्दिष्ट ओलांडणारी कामगिरी केली असली तरी कृषी पुरक उद्योगांसाठी मात्र तशी कामगिरी नोंदवली जावू शकली नाही.अग्रणी जिल्हा बँक विभागाने या संदर्भातील आकडेवारीची नोंद ठेवली आहे. त्यानुसार ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी खरीप हंगामाकरिता ४६ हजार ७५५ खातेदारांना ४३७ कोटी ५० लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. खरीप हंगामा अखेर ५८ हजार १५३ खातेदारांना ४८० कोटी १६ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले. ते उद्दिष्टाच्या १० टक्क्याहून जास्त होते.मत्स्य व्यवसायासाठी ११२१ खातेदारांना १४ कोटी २८ लाख रुपयांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. खरीप हंगामाअखेर ५०२ खातेदारांना फक्त ४ कोटी २१ लाख रुपयांचे वाटप होवू शकले. हे उद्दिष्टाच्या १ तृतीयांश पेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले. www.konkantoday.com