
नृत्य परिषद महाराष्ट्र च्या वतिने महाराष्ट्र डान्स प्रीमियर लीग (MDPL) हि महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय सोलो डान्स कॅम्पिटिशन आयोजित
नृत्य परिषद महाराष्ट्र च्या वतिनेमहाराष्ट्र डान्स प्रीमियर लीग (MDPL) हि महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय सोलो डान्स कॅम्पिटिशन आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा 14 वर्षांखालील छोटा गट आणि 15 वर्षा पुढील मोठा गट अशा दोन विभागांत होणार असून या स्पर्धेत 5 लाखांच रोख पारितोषिक, सहभागी प्रमाणपत्र, मॉडेल्स आणि ट्राॅफी देण्यात येणार आहेत ज्यात जिल्हास्तरीय प्राथमिक फेरीत प्रत्येक जिल्ह्य़ात 6 बक्षीस असे 36 जिल्ह्य़ात 216 बक्षीसे देणयात येतील. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 6 विभागवार उपान्त्य फेरी होईल त्यात प्रत्येक विभागात 6 बक्षीस असे6 विभागात एकूण 36 बक्षीसे आणि याची महाअंतिम फेरी पुणे येथे दि.25 ऑगस्ट ला होणार आहे ज्यात प्रथम क्रमांक रोख 1 लाख रूपये ट्रॉफी/प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक रोख 50 हजार रूपये ट्रॉफी/प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांक रोख 25 हजार रूपये ट्रॉफी/प्रमाणपत्र अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 590/-रूपये फक्त असणार आहे. या स्पर्धेतसाठी अनेक रिऍलिटी शो मधुन गाजलेले रूतुजा जुन्नरकर, वैष्णवी पाटील, वैभव वानखडे, दिपक हुलसुरे, पवन टाक आणि श्वेता परदेशी हे सेलेब्रिटी कोरिओग्राफर मेंटाॅर म्हणुन काम पहाणार आहेत.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रत्नागिरी जिल्हासाठी997030490, 8600143061 संपर्क क्रमांकावर संपर्क साधून सहभाग नोंदवू शकतात. अशी महिती स्पर्धेचे मुख्य आयोजक नृत्य परिषदेचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले, कार्याध्यक्ष मा. जतिन पांडे, सरचिटणीस मा. संतोष संखद आणि कोषाध्यक्ष मा. आशुतोष राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.