
निवळी फाटा येथे संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत 8 लाख 4 हजार रुपयांचा गुटखा जप्त
_स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अन्न व औषध प्रशासन यांनी रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील निवळी फाटा येथे संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत 8 लाख 4 हजार रुपयांचा गुटखा 7 लाख 25 हजार रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण 15 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई गुरुवारी सकाळी 8.30 वा. करण्यात आली असून गुटखा मालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.गुटखा मालक संकेत शिवाजी चव्हाण (30,रा.फणसोप सडा,रत्नागिरी), चालक विशाल बळवंत घोरपडे (32,रा.फणसोप सडा,रत्नागिरी) आणि सुरज राजू साळुंखे (33, रा.धायरी,पूणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.स्थानिक गुन्हा शाखेला निवळी फाटा येथील एका गोडावूनमधून गुटख्याची गाडी बाहेर पडणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार,त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांसह त्याठिकाणी सापळा लावला होता.