
नारी शक्ती दूत ऍपमध्ये ऑनलाईन अर्ज भरताना अनेक समस्या येत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या बहिणी हैराण
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींवर शासनाने तयार केलेली नारी शक्ती दूत ऍप रूसले असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या नव्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर अर्ज अपलोड होत नाही. त्यामुळे हे काम करणार्या अंगणवाडी सेविकांसह नियुक्त कर्मचारी हैराण झाले आहेत. या कामाची गती वाढवण्यासाठी अंगणवाडी केंद्रांमध्येही वायफाय सुविधा देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही नवी योजना आणली असून या योजनेतून पात्र बहिणींना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. २१ ते ६५ वयोगटातील विवाहित महिला व एका अविवाहितेला हा लाभ मिळणार असून यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला यापैकी एक तर पिवळे व केशरी रेशनकार्ड असणार्यांना उत्पन्न दाखला देण्याची गरज नसून रेशनकार्डची झेरॉक्स ग्राह्य धरली जाणार आहे. मात्र शुभ्र रेशनकार्ड असणार्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. प्रशासनाच्या सर्व्हेनुसार तालुक्यातील सुमारे ३८ हजार ८०० महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. www.konkantoday.com