चिपळूण नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून डास पैदास ठिकाणे केली जाताहेत नष्ट
सध्या चिपळूण नगर परिषद व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी शहरातील घराघरात फिरून डास पैदास ठिकाणांचा शोध घेवून ती नष्ट करीत आहेत. मच्छरच्या आळ्या मरण्यासाठी खास फवारणी केली जात असून नागरिकांना आजाराबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, मुख्याधिकारी विशाल भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे. यासाठी ९ पथके शहरात फिरून नागरिकांचे फ्रिज, कुलर, टायर, कुंडी, पिंप, टाकाऊ टायर, झाकण नसलेल्या टाक्या आदी साहित्यामध्ये पाणी साचले आहे काय, तेथे डासांची पैदास होतेय की नाही याचा शोध घेवून डास पैदास ठिकाणे नष्ट करीत आहेत. मच्छरांच्या काळ्या मराव्यात म्हणून फवारणीही केली जात आहे. www.konkantoday.com