ऍल्युमिनियम प्रकल्पग्रस्तांचे अनोखे आंदोलन सामुदायिक नांगरणी व शेती करून लक्ष वेधले

रत्नागिरी शहराजवळील उद्यमनगर भागात रत्नागिरीतील शेतकर्‍यांची सन १९६७ साली भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत चंपक मैदान परिसरातील जागेवर ऍल्युमिनियम प्रकल्प उभारण्यासाठी शेतकर्‍यांची सुमारे १२००० एकर जमीन संपादित केली. पण आजतागायत त्या ठिकाणी कोणताच प्रकल्प उभा न राहिल्याने त्या जागेपासून भूमिहिन झालेले शेतकरी पुन्हा एकदा न्यायहक्कांसाठी त्या जागेवर उतरले. कवडीमोल दराने जागा संपादित केल्या होत्या. त्याच जागा परत देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा त्याच जागेवर सामूहिक शेतलावणी आंदोलन करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले.रत्नागिरीत १९६७ साली भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत ऍल्युमिनियम प्रकल्प करण्याचे ठरले होते. पण रत्नागिरी येथील थोडेसे उत्पन्न येत असलेल्या व आपला उदरनिर्वाह करीत असलेल्या गोरगरीब शेतकर्‍यांना भूमिहिन केले. त्या जमिनी भांडवलदारांना मौजमजेसाठी सरकारने दिल्या आहेत. त्या जमिनी परत मिळविण्यासाठी गेली सुमारे ५३ वर्षे लढा दिला जात आहे. पण त्या लढ्याची शासनाने आजपर्यंत कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे ९ जुलै रोजी शहरानजिक ऍल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी येथील जमिनींचा ताबा घेवून शेती करण्यासाठी पुन्हा त्या संपादित केलेेल्या जमीन क्षेत्रावर ऍल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्तपणे उतरले होते. यावेळी उमेश खंडकर, सावंत आदी प्रकल्पग्रस्तही उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button