
शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या मातोश्री लीलाबाई कदम यांचे निधन
शिवसेना नेते सन्मा. रामदास भाई कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचे निधन झाले त्यांचा अंत्यविधी आज मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता जामगे स्मशानभूमी येथे होईल. त्यांच्या निधनाने खेड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. कै लीलाबाई कदम यांना चार मुलगे सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लिलाबाई गंगाराम कदम यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय शंभर वर्षांपेक्षा जास्त होते.
लिलाबाई कदम या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आजी होत.
त्यांच्या मागे चार मुले, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे, नात सुना आणि नात जावई असा मोठा परिवार आहे.




